माढ्याच्या विकासामध्ये आमदार शिंदे अपयशी : कांबळे

सोलापूर :

माढ्याच्या सर्वांगीण विकास करण्यामध्ये आमदार बबन शिंदे अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच यंदा या विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाचे वारे जोरात वाहत आहेत. महायुतीचे सहमतीचे उमेदवार संजय कोकाटे यांचा विजय झाल्यावर या भागात खऱ्या अर्थाने विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे मत जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी व्यक्त केले आहे.

टेंभुर्णी येथे आयोजित सभेत बोलताना कांबळे म्हणाले की, साखर कारखाने काढणे आणि त्याच जीवावर मतदान मागण्याचा कार्यक्रम विद्यमान आमदारांनी केला. मात्र, जनतेला हे सगळे समजले आहे. १९९५ मध्ये सुरू झालेल्या सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण करण्यात आमदारांना अपयश आले. त्यांनी जाणीवपूर्वक जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे केले. मात्र, हीच जनता यंदा बदल घडविणार आहे.

ते म्हणाले की, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, मंत्री प्रा. तानाजी सावंत, माजी रणजितसिंह मोहिते पाटील, प्रा. शिवाजी सावंत, माजी आमदार सुधाकर परिचारक आणि कल्याणराव काळे या सर्व नेत्यांनी महायुतीच्या पाठीमागे ताकद उभी केल्याने आमदार बॅकफुटवर आले आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*