रोजगारनिर्मितीवर भर देणार : बबन शिंदे

सोलापूर :

माढा विधानसभा निवडणुकीत यंदा सर्व विरोधकांनी एक होत राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांना कडवे आव्हान उभे केले आहे. विरोधकांनी येथील रोजगार, पाणीप्रश्न व उस उत्पादकांचे प्रश्न यावर आमदार शिंदे यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यावर उत्तर देताना रोजगारनिर्मितीसाठी या भागात औद्योगिक वसाहत आणण्याचे आश्वासन देण्यास शिंदे यांनी सुरुवात केली आहे.

जाहीर प्रचार सभेत बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, मागील पंचवीस वर्षात मतदारसंघाच्या विकासासाठी काम केले आहे. त्याच विकासकामांच्या जोरावर यंदाची निवडणूक जिंकणार आहे. दुष्काळी भागात पशुधन जगविण्यासाठी चारा छावण्या सुरु केलेल्या आहेत. तसेच पाणीपुरवठ्याची सोय करून येथील शेती पाण्याखाली आणली आहे. आता एमआयडीसी आणून या भागात तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य भरत शिंदे, विठ्ठलराव शिंदे, पांडूरंग पाटील, सीताराम गायकवाड, दगडू शिंदे यांच्यासह उपळाई बुद्रुक, रोपळे खुर्द, वडाचीवाडी, सोलंकरवाडी, जाधववाडी व बावी या भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*