फडणवीस हे छोटा महाठग : सिद्धरामय्या

सांगली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे दोघेजण देशातील महाठग असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छोटा महाठग असल्याची टीका कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे.

सांगली येथील कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत सिद्धरामय्या यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, केवळ उच्चभ्रू लोकांसाठी भाजप काम करीत आहे. गरीब, कष्टकरी, मजूर व सेहाताक्री यांना या पक्षाने वाऱ्यावर सोडले आहे. सामाजिक न्यायासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्रात परिवर्तन गरजेचे असल्याचे मतदारांना समजले आहे. तर, धनगर समाजाच्या मेळाव्यात त्यांनी स्वाभिमानाने भाजपविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*