चंपादाजी… पुरातून आला…; मनसेचे गाणे ट्रेंडमध्ये

पुणे :

यंदाचा प्रचार आघाडी-बिघाडीसारख्या अनेक फेसबुक पेजेसवर खालच्या पातळीवर गेला आहे. सत्ताधारी जनतेच्या मुलभूत प्रश्नांना न भिडता विरोधकांच्या भूतकाळावर टीका सुरु असतानाच आता मनसेने विशेष गाणे पेरीत व शाब्दिक कोट्या करीत पुण्यात प्रचाराला रंगत आणली आहे.

चंपादाजी.. चंपादाजी… पुरातून आला.. डोईजड झाला… असे विशेष गाणे मनसे वृत्तांत अधिकृत या फेसबुक पेजवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याला सोशल मिडीयावर जोरदार प्रतिसाद मिळत आहेत. “कोथरूडकरांना जाणीव झालीय, म्हणून तर वातावरण फिरलय, ‘चंपा’ ला घरी पाठवायचच, हे कोथरूडच्या जनतेचं पक्क् ठरलय!” असे लिहून हे गाणे व्हायरल होत आहे.

कोथरूडकरांना जाणीव झालीय, म्हणून तर वातावरण फिरलय, 'चंपा' ला घरी पाठवायचच, हे कोथरूडच्या जनतेचं पक्क् ठरलय!

Posted by मनसे वृत्तांत अधिकृत on Thursday, October 17, 2019
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*