फडणवीस रेवड्यावरचे पहिलवान; पवारांचा टोला

नाशिक :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना यंदा पुढे कोणीही पहिलवान नसल्याचे म्हटले होते. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फुदान्वीस यांना रेवड्यावरचे कुस्तीपटू म्हटले आहे. आता यावर भाजप काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिंपळगाव बसवंत येथील सभेत बोलताना पवार म्हणाले की, आमचा पहिलवान तेल लावून तयार आहे. पण कुस्ती कोणाबरोबर खेळायची हे ठरवावे लागते. लहान मुलांसमवेत कुस्ती खेळल्यास पिअसे नाही तर फ़क़्त रेवड्या मिळतात. पवारांच्या या खोचक टोल्यावर उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा गजर करीत जल्लोष केला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*