‘माझी सही माझे मत’ला जोरदार प्रतिसाद

अहमदनगर :

जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक  निवडणूक-2019 मध्ये भारत निवडणूक आयोगाच्या स्वीप मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत अहमदनगर शहरातील तीनही बसस्थानक व काही मुख्य चौकांमध्ये ‘माझी सही माझे मत’ हे मतदार स्वाक्षरी अभियान “मी मतदान करणारच” या घोषवाक्यासह राबविण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निर्देशानुसार हे अभियान राबविण्यात आले.

मी मतदान करणारच या शीर्षकाखाली अहमदनगर शहरातील तीनही बसस्थानकावरील प्रवाशांनी मोठ्या संख्येने मतदार स्वाक्षरी अभियानामध्ये सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी केला. त्याचबरोबर मतदारांकडून संकल्पपत्र देखील भरून घेण्यात आले. पीडब्ल्यूडी, 1950 ,डब्लूडब्लूडब्लू डॉट एनव्हीएसपी डॉट इन, सी व्हीजील सुविधा, या भारत निवडणूक आयोगाच्या मतदार जनजागृतीच्या विविध घटकांबद्दल देखील माहिती देण्यात आली. दिव्यांग मतदारांच्या सुविधेबद्दल विशेष माहिती दिली देण्यात आली. काही मतदार आपल्या स्वाक्षरीबरोबरच मतदान जनजागृती घोषवाक्य व संदेशदेखील स्वाक्षरी फलकावर लिहीत आहेत. या फलकाच्याशेजारी ठेवलेल्या सेल्फी पॉइंटवर फोटो काढून स्वतःच्या सोशल मीडियावर ते पोस्ट करीत आहेत.

माळीवाडा बसस्थानकावर या उपक्रमाचा शुभारंभ स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) दिलीप थोरे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक विठ्ठल केंगारकर, बस स्थानक आगार प्रमुख अविनाश कलापुरे, वाहतूक निरीक्षक श्री. माने, विस्ताराधिकारी श्री.ठोकळ तसेच आदेश आवारे, गणेश ढोले, नाना डोंगरे, स्वाती अहिरे, किशोर अहिरे, सतीश शिर्के, संतोष कानडे, अशोक घोरपडे, गणेश चिल्का  या कॅम्पस अँम्बेसेडर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगर कॉलेज एनएसएस विभागातील  विद्यार्थिनींनी उपक्रमात सहभाग होऊन “आम्ही मतदान करणारच” असा संकल्प केला. मतदारदूत डॉ.अमोल बागुल यांनी मतदार जनजागृतीची शपथ दिली.

या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी ,उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन उबाळे,स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी- माध्यमिक दिलीप थोरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, तहसीलदार (निवडणूक चंद्रशेखर शितोळे), मतदारदूत डॉ. अमोल बागुल यांनी मार्गदर्शन केले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*