माणदेशाच्या विकासासाठी देशमुखांना साथ द्या; ‘आमचं ठरलंय’ टीमचे आवाहन

सातारा :

माण तालुक्यात एमआयडीसी आणून औद्योगिक विकास केल्याचा दावा माजी आमदार करतात. मात्र, शंभर एकरातील औद्योगिक वसाहतीत मोठे उद्योग सोडाच, पण गुळाचे चांगले गुऱ्हाळ देखील होऊ शकत नाही. यंदा माणदेशी माणूस भूलथापांना भुलणार नाही. त्यामुळेच माण-खटाव मतदारसंघाच्या औद्योगिक विकासासाठी सर्वसंमतीने दिलेले अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांनाच साथ देण्याचे आवाहन आमचं ठरलंय टीमच्या सत्रेवाडी (पिंगळी) येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत हर्षदा देशमुख-जाधव यांनी केले आहे.

यावेळी नगरसेवक अजित पवार, बाबाराजे हुलगे, विभावरी भोसले, सुभाष पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत सर्व वक्त्यांनी माजी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच यंदा परिवर्तन करण्यासाठीची शपथही त्यांनी घेतली. हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या की, पाण्याची उपलब्धता झाल्याने आता या भागात पाच हजार एकरात ‘औद्योगिक प्रकल्प उभारण्यासाठी देशमुख यांना निवडून देण्याची गरज आहे. मतदारसंघात पाणी आणल्याचे माजी आमदार म्हणतात. मग त्याच्याच बोराटवाडी गावात मग टँकर का सुरु होता? प्रभाकर देशमुख यांनी प्रशासकीय काळापासून माणमधील दुष्काळ हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांनी जलसंधारणाची चळवळ राबवून गावे पाणीदार केली आहेत. मतदारसंघातील दुष्काळ हद्दपार करण्याबरोबरच उच्च प्रतीचे शिक्षण, आरोग्य सुविधा व रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील ते प्रयत्नशील आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*