भर पावसात केली पवारांनी फटकेबाजी..!

सातारा :

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथील सभेत भर पावसात फटकेबाजी करून सत्ताधारी भाजपची पिसे काढली. तसेच यंदा राज्यात सत्तांतर होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.

साताऱ्यात शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. अशावेळी पवार जेव्हा सभा घेत होते त्याचवेळी पाऊस पडू लागला. कार्यकर्ते अशाने आता सभा आटोपती घेतली जाईल या धास्तीत होते. मात्र, पवार यांनी भाषण न थांबवता भर पावसात कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणारे भाषण ठोकले. त्यांचा हा उत्साह पाहून कार्यकर्तेही भारावून गेले. 

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*