मुसळधार पावसात रंगली पॉवरबाज सभा..!

सातारा :

लोकसभा पोटनिवडणुक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुसळधार पावसात सभा घेऊन तरुणांना नवी प्रेरणा, उमेद व विश्वास देण्याचा प्रयत्न केला.

पायाला जखमा असतानाही महाराष्ट्रभर सभा घेणाऱ्या पवारांचे फोटो व्हायरल होत असतानाच त्यांनी साताऱ्यात पॉवरबाज सभा घेऊन राष्ट्रवादीसह सर्व विरोधकांना लढण्याचा नवा विश्वास दिला आहे. लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत ते म्हणाले की, आम्ही साताऱ्यातील निवडणुकीत चूक केली होती. ती चूक दुरूस्त करण्यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्ते व मतदार प्र21 तारखेची वात पाहत आहेत.

या सभेत माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पवारांनी जोरदार टीका केली. पवार पावसात भिजून जनतेला संबोधित करत असताना आपल्या नेत्याचे हे रुप पाहून सातारकर भारावले होते. पवारांच्या भाषणाला टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून जोरदार प्रतिसाद उपस्थितांकडून मिळत होता.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*