फ़क़्त पवार नाही नातू रोहीतचेही भर पावसात भाषण..!

अहमदनगर :

साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे भर पावसातील भाषण सध्या सोशल मिडीयावर जोरात ट्रेंड होत आहे. त्याचवेळी त्यांचा लाडका नातू रीहीत पवार यांचेही पावसामधील भाषण आता कौतुकाचा भाग बनले आहे.

रोहित पवार यांना पक्षाने कर्जत-जामखेड या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. परंपरागत आणि आधुनिक अशा दोन्ही प्रचार पद्धतीचा मेळ घालून रोहित पवार कर्जत व जामखेड तालुक्यात गावोगावी जावून परिवर्तनाची हाक देत आहेत. त्यांना जनतेचा मिळणारा प्रतिसाद भाजपच्या गोटात काळजी वाढविणारा ठरला आहे.

अशावेळी पवार आजोबा व नातू रोहित या दोघांचे भर पावसात भाषण करून समाजाबद्दल तळमळीने बोलणारे व्हिडिओ ट्रेंडमध्ये आहेत. एकूणच प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने राज्यातील राजकारणावरील मळभ घुण्याचे काम केल्याची प्रतिक्रिया सोशल मिडीयावर यानिमित्ताने उमटत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*