सलमान खानचा शेरा शिवबंधनात..!

मुंबई :

वादग्रस्त असूनही सुप्रसिद्ध असलेल्या सुपरस्टार सलमान खान याच्या शेरा नावाच्या बॉडीगार्डने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत राजकारणात येण्यासाठी शिवबंधन बांधून घेतले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात शिवसेनेत येत शेरा याने पुढील राजकीय दिशा जाहीर केली आहे. त्याला पक्षात कोणते पद देणार हे अजूनही जाहीर झालेले नाही. मात्र, पक्षप्रवेशानंतर शेरा यांनी शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी आपलं भरीव योगदान योगदान देणार असल्याचं सांगितले. आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*