आज ५ वाजता जाहीर प्रचार थंड होणार..!

पुणे :

अवघ्या महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक व आर्थिक दिशा निश्चित करण्यासाठी होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता आज शनिवारी (दि. १९ ऑक्टोबर २०१९) सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

मागील पंधरा दिवस राज्यभरात सर्व राजकीय पक्षांनी छोट्या-मोठ्या जाहीर सभा आणि कार्यकर्ते मेळावे घेत मतदारांना आपल्याच पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मतदार कोणाला कौल देतात हे दि. २४ ऑक्टोबरच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. दि. २१ ऑक्टोबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी निवडणूक आयोगाने केली आहे.

जाहीर प्रचारात राज्यामधील मुद्दे कमी आणि पाकिस्तान, राम मंदिर व परदेशात सुरू असलेला भारताचा उदोउदो यावरच सत्ताधारी भाजप बोलत राहला. तर, शिवसेनेला 10 रुपयांच्या थालीच्या पुढे कुठलाही विकास करणे स्पष्ट शब्दांत सांगता आलेले नाही. त्याचवेळी मनसे या राजकीय पक्षाने काही मुद्दे मांडतानाच मागच्या निवडणुकी सारखी हवा टाईट करण्यात विशेष यश मिळवले नाही. कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांनी बेरोजगारी, आर्थिक मंदी, शेत व ग्रामीण भागाच्या समस्या यावर निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. तर, वंचित आघाडीने इतरांवर टीका करताना सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचे आश्वासन दिले. अशा पद्धतीने राज्याच्या विकासाचे मुद्दे सोडून फ़क़्त टीका या एकाच मुद्यावर ही निवडणूकही आणण्यात सर्व राजकीय पक्षांना यश आले आहे. त्यावर मतदार कोणाला कौल देतात याकडे देशाचे लक्ष असेल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*