म्हणून माढ्यामध्ये भगवा नक्की फडकणार : खासदार निंबाळकर

सोलापूर :

माढा मतदारसंघामध्ये यंदा परिवर्तन निश्चित आहे. विद्यमान आमदारांनी पंचवीस वर्षामध्ये विकासकामे करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. अशावेळी सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि उजनी धरणाचे पाणी टेल टू हेड मिळायचे असेल तर शिवसेना-भाजप महायुतीचा भगवा या मतदारसंघावर फडकाविणे ही गरज आहे. जनतेचा कौल पाहता यंदा भगवा नक्कीच फडकणार असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.

मोडनिंब येथील सभेत बोलताना खासदारांनी राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्यावर विकासकामात खोडा घालून जनतेचा विश्वासघात केल्याची टीका केली. तसेच शिवसेना उमेदवार संजय कोकाटे यांचा विजय होणार असेही ते म्हणाले. यावेळी शिवसेना, भाजप, रिपाई, रसाप, रयत क्रांती व शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते व मतद्र उपस्थित होते.

या प्रचारसभेत भूषण होळकर, वैभव मोरे, सुहास पाटील, मधुकर देशमुख, सागर गिड्डे, पांडुरंग राउत, नागनाथ ओहोळ, संतोष पाटील हे उपस्थित होते. यावेळी प्रा. शिवाजी सावंत म्हणाले की, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामध्ये मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनाही मोठी जबाबदारी मिळेल. त्यांच्या माध्यमातून माढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी यंदा येथे भगवा फडकाविणे गरजेचे आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*