प्रभाकर देशमुखांचा विजय होणार : डॉ. येळगावकर

सातारा :

फ़क़्त निवडणुका आल्या की पाण्याचे गाजर दाखवून दहा वर्षे माण-खटाव या भागाला दुष्काळात लोटण्याचे काम विद्यमान आमदारांनी केले आहे. मात्र, यंदा माणदेशी जनता अशा भूलथापांना बळी पडणार नाही. यंदा अपक्ष उमेदवार माजी प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख यांचाच विजय होणार असा विश्वास डॉ. दिलीप येळगावकर यांनी व्यक्त केला.

माण तालुक्यातील बिजवडी येथील रॅलीनंतर आयोजित कोपरा सभेस संबोधित करताना डॉ. येळगावकर म्हणाले की, मतदारसंघातील वाईट शक्ती बाहेर घालविण्याची ही वेळ आहे. पाणी आणण्याचे सांगून छावण्या सुरु ठेवण्याची वेळ आणली विद्यमान आमदारांनी. जनता यंदा त्यामुळेच परिवर्तन करण्यासाठी निवडणूक हातात घेऊन देशमुख यांच्या पाठीशी उभी आहे. विद्यमान आमदार व भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे यांच्यावर डॉ. येळगावकर यांनी लबाड लांडगा अशी उपमा देत जोरदार टीका केली.

अनिल देसाई, डॉ. संदीप पोळ, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष एम के. भोसले, रसापचे मामुशेठ वीरकर, नकुसाताई जाधव, पिंटूशेठ जगदाळे यांच्यासह कार्यकर्ते व मतदार यावेळी उपस्थित होते. ‘आमचं ठरलंय’ टीमने या भागात परिवर्तनाची लाट निर्माण करण्यात यश मिळवल्याने यंदा येथे देशमुख यांचा विजय होणार असल्याचा विश्वास या सगळ्यांनी व्यक्त केला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*