‘आमचं ठरलंय’ ५० हजारांनी विजय मिळविण्याचे : देसाई

सातारा :

माण-खटाव विधानसभा मतदारसंघात यंदा कॉंग्रेसमधून भाजपवासी झालेल्या जयकुमार गोरे व शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या विरोधात ‘आमचं ठरलंय’ टीम जोमाने प्रचार करीत आहे. या टीममधील सदस्य अनिल देसाई यांनी यंदा या विधानसभा मतदारसंघात सहमतीचे उमेदवार माजी प्रशासकीय अधिकारी प्रभाकर प्रभाकर देशमुख यांचा किमान ५० हजार मतांनी विजय होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

बिजवडी (ता. माण) येथील प्रचार कार्यक्रमात देसाई यांनी गोरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, मीच एकटा नेता, बाकी फ़क़्त चोथा, अशी वागणूक देणाऱ्यांना यंदा येथील मतदार विधानसभेत पाठविणार नाहीत. त्रास दिलेले सगळे विरोधक कार्यकर्ते यंदा एकवटले आहेत. कुकडवाड झेडपी गटातून यंदा देशमुख यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची शपथ आम्ही कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

यावेळी डॉ. दिलीप येळगावकर, डॉ. संदीप पोळ, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष एम के. भोसले, रसापचे मामुशेठ वीरकर, नकुसाताई जाधव, पिंटूशेठ जगदाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. भोसले म्हणाले की, देशमुख यांनी या भागाच्या विकासासाठी केलेले काम मोठे आहे. गावे पाणीदार करण्यासाठीची त्यांची चळवळ हजारो शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरली आहे. तर, वीरकर म्हणाले की, देशमुख यांचा प्रशासकीय कामाचा अनुभव मोठा आहे. राज्यभरात त्यांनी आपली प्रभावी अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली आहे. येथील धनगर समाजाने देशमुखांना एकगठ्ठा मतदान करून विजयासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत.दि. २४ ऑक्टोबर रोजी निकालात मोठे मताधिक्य नक्कीच असेल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*