वेंगुर्लाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करणार : केसरकर

सिंधुदुर्ग :

सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांनी वेंगुर्ल्यातील भटवाडी येेथे वेंगुर्ला शिवसेना शाखा वॉर्ड नं. ३ चे शाखाप्रमुख डेलीन डिसोझा यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी तेथील स्थानिक नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला स्थानिक नागरिकांचे विविध प्रश्न समजून घेतले व येणाऱ्या काळात वेंगुर्लाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करणार.

त्याचप्रमाणे सावंतवाडी सेट-टॉप-बॉक्स फॅक्टरीमध्ये युवकांसाठी नोकरी उपलब्ध करून देऊ, व भटवाडी इथल्या होळकर मंदिरासाठी  शेड उभारु जेणेकरून लोकांना उन्हात उभे राहता येणार नाही असे यावेळी बोलताना दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. यावेळी महिला मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या. त्याचबरोबर शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*