सावंतवाडीमध्ये शिवसेनेचा विजय होणारच : नार्वेकर

सिंधुदुर्ग :

मच्छीमार बांधवांसाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विविध योजना आणल्याने आम्ही त्यांच्या कामावर प्रभावित झालो आहोत. त्यामुळे शिरोडा केरवाडा या गावातून केसरकरांना 100 टक्के मतदान होईल. तसेच यंदा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा भगवा पुन्हा दिमाखात फडकेलम, असा विश्वास मच्छीमार सोसायटीचे चेअरमन काशिनाथ नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे.

सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघात झालेल्या विकासकामांमुळे महायुती सरकारच्या कारभारावर येथील जनता प्रभावी आह, असे त्यांनी म्हटले.. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी शिरोडा केरवाडा येथील मच्छीमार बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख यशवंत परब, शिरोड्याचे उपसंरपच रवी पेडणेकरही उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*