म्हणून देशमुखांना आमदार करा; शेट्टी यांचे आवाहन

सातारा :

माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे सर्वसहमतीचे अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्यासारख्या प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीला निवडून दिल्यास या भागातील दुष्काळमुक्ती नक्की होऊ शकते. म्हणून त्यांना या भागाचे आमदार म्हणून निवडून देण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

विशेष व्हिडीओ शेअर करून शेट्टी यांनी हे आवाहन माणदेशी जनतेला केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा भाग हिरवागार करायचा असेल. तर आपणाला देशमुखांना आमदार केल्याशिवाय पर्याय नाही. पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा मी जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. तेंव्हा मी देशमुखांचे काम जवळून पाहिलं आहे, अनुभवले आहे. त्यांची कामावरची निष्ठा व विकासाची दृष्टी या भागाच्या विकासासाठी महत्वाचे योगदान देण्यासाठी वापरण्याची गरज आहे. आमदार नसतानाही त्यांनी या भागात मोठे काम उभे केले आहे. आमदार झाल्यास त्यांच्या कामाला आणखी गती येईल.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अद्यक्ष राजू शेट्टी यांनीं माण-खटावच्या विकासासाठी सर्व जनतेने प्रभाकर देशमुख साहेबांच्या पाठीशी राहावे आणि साहेबांना बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन केले.#भावी_आमदार #देशमुख_साहेब

Posted by प्रभाकर देशमुख – जलपुत्र on Friday, October 18, 2019
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*