रोहितचा विजय निश्चित; शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास

अहमदनगर :

आपलं सगळ्यांचं ठरलंय म्हटल्यावर कर्जत-जामखेडच्या जागेचा आताच निकाल लागल्यात जमा आहे. दि. २४ ऑक्टोबरला निकालात रोहित पवार यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याचे स्पष्ट झालेले दिसेलच, असा विश्वास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व रोहित यांचे आजोबा शरद पवार यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रभर सभा घेतल्यानंतर आता अखेरच्या दिवशी रोहीतदादा यांच्यासाठी प्रचारसभा घेऊन मतदारांना भावनिक साद घातली. पवार साहेब म्हणाले की, बारामतीच्या विकासाला पन्नास वर्षे लागली. मात्र, कर्जत-जामखेडच्या विकासाला आम्हाला फ़क़्त पाच-सात वर्षे पुरे आहेत. त्यासाठी स्थानिक जनतेने रोहितला साथ द्यावी. त्याच्यामध्ये विकासासाठीचा दृष्टीकोन आहेच. त्याचा उपयोग करून या भागाचा विकास तो नक्कीच करू शकतो.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*