अजितदादांनी शब्द खरा केला; बारामतीत फ़क़्त अखेरचीच सभा

पुणे :

भाजपने आक्रमक नेते गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये उमेदवारी देत राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेरबंद करण्याचे मनसुबे आखले. मात्र, त्याला दाद न देता एक लाख मतांनी विजयी होण्याचा विश्वास व्यक्त करीत बारामतीत फ़क़्त अखेरची एक सभा घेण्याची घोषणा अजितदादांनी केली होती. त्यानुसार त्यांनी आज शनिवारी सायंकाळी फ़क़्त एकच सभा घेऊन आपला शब्द खरा केला आहे.

अजितदादा यांना जेरबंद करण्यासह कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांना मतदारसंघात अडकून ठेवण्यासाठीचे प्रयत्न भाजपने करून पहिले. मात्र, राष्ट्रवादीच्या बहुसंख्य नेत्यांनी त्या चक्रव्युहास विशेष दाद दिली नाही. कॉंग्रेसचे काही नेते मात्र त्यात अडकले. अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी तर राज्यभर प्रचार दौरे आयोजित करून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी होण्यासाठी मोठी प्रेरणा दिली. त्यामुळे यंदाची राज्य विधानसभा निवडणूकही एकांगी न होता चुरशीची बनली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*