तिथून झाली ‘चंपा’ शब्दाची निर्मिती : अजित पवार

पुणे :

सोशल मिडीयावर आणि निवडणुकीच्या जाहीर प्रचारात चंपा हा शॉर्टफॉर्म म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रकांत पाटील अशीच ओळख आता पक्की झाली आहे. हा शब्द प्रथम कुठून आला याचे कोडे अनेकांना पडले होते. त्यावरच प्रकाशझोत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी टाकला आहे.

पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख करताना चंपा हा शब्द माझ्यासमोर पहिल्यांदा एका भाजपा कॅबिनेट मंत्र्यानेच उच्चारला होता. एकदा एका कामानिमित्त आमच्या संघटनेच्या एका सहकाऱ्याबरोबर मी एका मंत्र्यांकडे गेलो होतो. त्यावेळी त्या सहकाऱ्याने तुमचे शिफारस पत्र असेल तर काम लवकर होईल असे म्हटले होते. संबंधित मंत्र्याने शिफारसपत्र कितपत उपयोगी ठरेल याबद्दल साशंकता व्यक्त करताना म्हटले की, चंपा माझे ऐकत नाहीत. त्यावेळी मी म्हटले काय..! बाहेर आल्यानंतर सहकाऱ्याशी बोलताना मला चंपाचा अर्थ खर्या अर्थाने उलगडला. चंद्राकांतमधील चं आणि पाटील मधला पा एकत्र करुन त्या भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्याने हा शॉर्टफॉर्म बनवल्याचे लक्षात आहे.

मात्र, अजितदादा यांनी संबंधित मंत्र्याचे नाव जगजाहीर सांगितलेले नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*