माणदेशात यंदा परिवर्तन होणार; देशमुख यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

सातारा :

राज्यभरात यंदा चर्चेच्या केंद्रासाठी माण-खटाव येथील विधानसभा निवडणूक आणण्यात आमचं ठरलंय टीमला यश आले आहे. येथे जोरदार प्रचार करून आणि सहमतीची मोट बांधून परिवर्तनाचा नारा देण्यात टीम यशस्वी झाल्याने आपलाच विजय होणार असा विश्वास अपक्ष उमेदवार माजी प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

म्हसवड (ता. माण) येथील प्रचार सांगता सभेत शनिवारी ते म्हणाले की, या दुष्काळी भागाच्या अस्मिता व स्वाभिमानाची ही लढाई यंदा विकासाचा विचार नक्कीच जिंकणार आहे. येथील मतदारांनी तसा निश्चय केला आहे. मतदान यंत्रातून हा विश्वास दिसेल. यावेळी डॉ. दिलीप येळगावकर. प्रभाकर घार्गे, रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, सुरेंद्र गुदगे, डॉ. संदीप पोळे, संदीप मांडवे,मामुशेठ वीरकर, विलास माने, अजित राजेमाने. एम. के. भोसले, सुरेश शिंदे, प्रा. बंडा गोडसे, श्रीराम पाटील, सुभाष नरळे, दिलीप तुपे, सुरेश पोळ, बाबासाहेब मदने, अनिल पवार, किशोर सोनवणे, विश्वंबर बाबर, बाळासाहेब काळे, जे. टी. पोळ, धैर्यशील पाटील आदि उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*