विधानसभेसह माढ्यामध्ये भगवा फडकणार : बानगुडे पाटील

सोलापूर :

राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना त्यांनी शेतकरीविरोधी निर्णय घेऊन ग्रामीण भागाच्या विकासाला खीळ बसविली. मात्र, यंदा तसे काही होणार नाही. विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडकणार असून माढा विधानसभा मतदारसंघातूनही यंदा महायुतीचे उमेदवार संजय कोकाटे यांचा दणदणीत विजय होणार असल्याचा विश्वास शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केला.

टेंभूर्णी (ता. माढा) येथील सभेत बानगुडे पाटील यांनी आघाडी सरकारसह माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांच्य्वर घणाघाती टीका केली. या प्रचार सांगता सभेस माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, संभाजी शिंदे, प्रा. शिवाजी सावंत, कल्याणराव काळे, शिवाजी कांबळे, पृथ्वीराज सावंत, प्रा. सुहास पाटील, अॅड. कृष्णात बोबडे, भारत पाटील, प्रणव परिचारक, संभाजी शिंदे, रामचंद्र टकले, जयसिंग ढवळे, सुधाकर कवडे, मधुकर देशमुख, बाळासाहेब देशमुख, कुमार वाघमारे, परमेश्वर खरात, किशोर सलगर, माउली सलगर, योगेश बोबडे आदि उपस्थित होते. मोहिते पाटील यावेळी म्हणाले की, माळशिरस तालुक्यातून यंदा कोकाटे यांक=ना किमान 18 हजारांचे विजयी मताधिक्य मिळेल.

उमेदवार संजय कोकाटे म्हणाले की, यंदा पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. त्यासाठी सर्वसहमतीने मला विधानसभेत पाठविण्याचा निर्णय सर्व जेष्ठ नेते व माढ्याच्या मतदारांनी घेतला आहे. जनतेच्या शिर्वादाने दणदणीत मताधिक्यासह ही जागा आपण जिंकणार आहोत. विद्यमान आमदारांनी मागील पाच वर्षांच्या कालावधील विकास करण्याऐवजी भ्रष्ट्राचार केला. आता हीच जनता त्यांना या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखविणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*