शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार : मुनगंटीवार

मुंबई :

महायुतीचा मुख्यमंत्री कोण, यावरून सध्या भाजप व शिवसेना या दोन्ही मित्रपक्षांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. भाजपच्या वाढत्या दबावापुढे शिवसेना मलूल झालेली असतानाच आता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सेनेला टोला हाणून पुढील दिशा स्पष्ट केली आहे.

देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिकच आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेलाच दिलं आहे, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी शिवसेनेला टोला लगावला. ते म्हणाले की, चालू आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. शिवसेनेचे मंत्रीही त्यावेळी शपथ घेतील. ‘नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे’ असं म्हणतं सेना आमच्यासोबत येईल. आमची सत्तावाटपाबाबत आमची चर्चा सुरू आहे. परंतु शिवसेना ही १३ पेक्षा अधिक खात्यासांठी पात्र आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*