तर ‘ती’ खेळी फसण्याची शक्यता..!

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील मतदारांनी विचारपूर्वक मतदान करताना लोकशाही वृद्धिंगत करण्याची खेळी खेळली. त्याच खेळत अडकून आता भाजप व शिवसेना हे मित्रपक्ष जाम झाले आहेत. सेना पाठिंबा देत नसल्यास सेनेला बाजूला ठेऊन सत्तासोपन चढण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी केली आहे. मागील पाच वर्षांपूर्वी सेनेला बाजूला ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्यावर भाजप सत्तेवर आला होता. आता सेना ठरलेल्या समिकरणावर ठाम राहिल्याने अशावेळी सेनेला बाजूला ठेऊन पुन्हा अल्पमतातील सरकार उभे करण्याचा डाव भाजपने रचला आहे. मात्र, अशावेळी जर सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी विरोधात मतदान केले तर पुढील भाजप सरकार औटघटकेचे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ताकही फुंकून पीत आहेत.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*