Blog | काळजीवाहू अशी कोणतीही तरतूदच नाही..!

राज्यातील सत्तेचा पेच काही सुटण्याची चिन्हे नसल्याने आता राज्यातील जनता अभूतपूर्व पेचात पडली आहे. अशावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यवाहक म्हणून राहण्याची जबाबदारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे. मग जनतेला प्रश्न पडला आहे की, असे काळजीवाहक मुख्यमंत्री किती दिवस राहणार, आणि कधी राष्ट्रपती राजवट लागू होणार किंवा नवीन मुख्यमंत्री शपथविधी घेणार, याबद्दलची चर्चा जोमात आहे.

राज्य घटनेतील कलम १७२ च्या तरतुदीनुसार तेरावी विधानसभा शनिवारी (दि. 9 नोव्हेंबर 2019) मध्यरात्री संपुष्टात येत आहे. निवडून आलेल्या नव्या आमदार अर्थात सदस्यांची नावे आधीच राजपत्रात प्रसिद्ध झाली असल्याने १४ वी विधानसभा अस्तित्वात आली आहे. मात्र, सत्ता काही अजूनही स्थापन न झाल्याने मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ अजूनही शपथ घेऊ शकलेले नाहीत. त्यामुळे राज्यावर काळजीवाहक मुख्यमंत्री बसविण्यात आलेले आहेत.

भारतीय राज्यघटनेत काळजीवाहू अशी तरतूदच नाही. अशा काळजीवाहक मुख्यमंत्र्यांसाठी कोणतीही कालमर्यादा दिलेली नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री हा जास्त काळ पदावर राहू नये हे संकेत असल्याने राज्यपालांनी आता सरकार स्थापण्याची प्रक्रिया सुरू करायला पाहिजे, असे अनेक घटना अभ्यासकांचे मत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*