व्हॉट्सअपवर व्यापारी दाखवू शकणार प्रॉडक्ट्स कॅटलॉग..!

पर्सनल चॅटिंग आणि ग्रुप चॅटिंगसाठी जगभरात वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सअपने आता बिझनेस अप्लिकेशनमध्ये नवीन फिचर देऊन छोट्या व मध्यम व्यापाऱ्यांना विशेष भेट दिली आहे. व्यापारांसाठी बिझनेस अॅपमध्ये कॅटलॉग्स फीचर जोडले आहे. ज्याद्वारे व्यापारी आपल्या उत्पादनाची माहिती व भावफलक प्रसिद्ध करू शकणार आहेत.

कॅटलॉगमध्ये उत्पादनाचा कोड, फोटो, किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर या सारखी आवश्यक माहिती व्यापाऱ्यांना जोडता येणार आहे. कंपनीचे याबाबत म्हणणे आहे की, याद्वारे व्यापारी आणि ग्राहक दोघांच्याही फोनचे स्टोरेज वाचण्यास मदत होईल. अनेक व्यापाऱ्यांनी या सुविधेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे.

अनेक व्यापारी आता आपले मोबाईल अप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध करून देत आहेत. मात्र, त्यासाठीच मेंटेनन्स खर्च आणि लागणारी इतर सेवाशुल्क लक्षात घेता ते सगळ्यांना शक्य होत नाही. मात्र, आता व्हॉट्सअपचे कॅटलॉग्स फीचर मोबाइल स्टोअरप्रमाणे काम करेल. यामध्ये व्यापारी प्रॉडक्टची माहिती पाहू आणि शेअर करू शकतील. याद्वारे ग्राहक आपल्या सुविधेनुसार प्रॉडक्ट शोधून त्याविषयीची माहिती मिळवू शकतील.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*