वेध लागे मंत्रालायाचे; म्हणून सध्या मंत्रिपदाचे..!

पुणे :

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागूनही सत्ता कोणत्या पक्षाच्या हाती असणार, याचे कोडे महाराष्ट्रात सुटलेले नाही. अशावेळी सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला बहुमत सिद्ध करण्याची पहिली संधी खुली केली आहे. तर, अशावेळी महायुतीचा मित्रपक्ष मंत्रालयाचे वेध लागूनही मंत्रिपदाचे अपेक्षित सध्या मिळत नसल्याने भाजपच्या समोर आव्हान उभे करीत आहे.

भाजप व शिवसेना एकत्र आल्यास बहुमताचा आकडा सहजपणे स्पष्ट दिसेल. मात्र, मागील सरकारमध्ये दिलेली आश्वासने न पाळता सेनेला कोंडीत पकडण्याचे धोरण भाजपने ठेवले. त्यामुळे सेनेचे आमदार व नेते दुखावले. मात्र, पक्षाची गरज म्हणून त्यांनी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविली. अशावेळी सत्तेच्या चाव्या सेनेच्या हातात आल्याने राज्यात सेनेला सध्या सर्वाधिक महत्व आले अआहे. सेना ज्यांच्याबरोबर जाईल, सराकर त्यांचे होईल असे गणित आहे. मुख्यमंत्री पदासह सर्व आश्वासन पूर्ण करून घेण्यासाठी अशावेळी सेना धडपडत आहे, तर भाजपचे राज्यातील नेतृत्व चाचापडत आहे. आज रविवारी रात्री उशिरापर्यंत यावर तोडगा निघण्याची अपेक्षा भाजपला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*