१२ नोव्हेंबरला ठरणार राष्ट्रवादीची खरी दिशा..!

मुंबई :

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुताण्याची काही चिन्हे नाहीत. हा तिढा सोडविण्यासाठी भाजपचे केंद्रीय नेतृत्व विशेष लक्ष देत नसल्याने राज्यातील भाजप नेतृत्वाची गोची झाली आहे. राज्यपालांनी बहुमात सिद्ध करण्याचे निमंत्रण देऊनही हा पक्ष शांत आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपली खरी व अंतिम दिशा ठरविण्यासाठी मंगळवारी, दि. १२ नोव्हेंबर रोजी मुंबईत बैठक बोलविली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक मुंबईत मंगळवारी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित केली आहे. बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. त्याबाबत सूचक वक्तव्य करताना राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक म्हाणाले की, घोडेबाजार सुरू होऊ नये यासाठी राज्यपालांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पटलावर भाजपच्या विरोधात मतदान करेल. शिवसेनेने विरोधात मतदान केले आणि पटलावर सरकार पडले तर पर्यायी सरकार निर्माण करण्याबाबत पक्ष विचार करू शकतो.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*