देवेंद्रजी, तुमचा अभिमान वाटतो : अमृता फडणवीस

नागपूर :

देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा सोशल मिडीयावर चर्चेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यावरच अमृता यांनी देवेंद्रजी, तुमचा अभिमान वाटतो, असं ट्वीट केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांचा आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकांचा अभिमान वाटतो, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी 100 नाही तर 200 टक्के काम केलंय. देवेंद्रजींसारखं काम आजपर्यंतही कुणी केलेलं नाही, आणि इथून पुढेही कुणी करू शकणार नाही, असं मत अमृता फडणवीस यांनी मांडले होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*