BLOG | होय, नोटाबंदी पूर्णपणे यशस्वी झालेली आहे..!

नोटाबंदी पूर्णपणे यशस्वी झालेली आहे ह्या सरकार आणि भक्तांच्या दाव्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. नोटाबंदी सारख्या निर्णयामागे काय उद्दिष्ट होती अस सगळे विचारायला लागलेत. आर्थिक उद्दिष्ट पूर्ण होवोत ना होवोत मात्र राजकीय उद्दिष्ट पूर्ण झालेली आहेत.

लेखक : आनंद शितोळे, अहमदनगर (फेसबुक खात्यावरून साभार)

गल्ली ते दिल्ली सगळ्या ठिकाणी ,सगळ्या राज्यात निरंकुश सत्ता मिळवायची , मिळालेली सत्ता आपला धार्मिक अजेंडा रेटायला पुढे वापरायची आणि ज्या उद्योगांनी आपल्याला सत्तेपर्यंत जायला मदत केलेली आहे त्यांची व्याजासह परतफेड करायला हि सत्ता त्यांचा व्यापार देशात आणि परदेशात वाढवायला वापरायची हे साध सरळ उद्दिष्ट भाजप आणि संघाच आहे.

नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदी लागू केल्यानंतर समाज माध्यमात आधीच भाजपने वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी केलेल्या जमिनीच्या व्यवहारांचे तपशील , गुजरातमध्ये अमित शहाच्या संबंधित सहकारी बँकेत झालेले व्यवहार आणि पैशाचा भरणा ,त्यानंतर समाजमाध्यमात खुलेआम भाजप नेत्यांच्या पोरांच्या हातात दिसलेले २००० च्या नोटांचे बंडल ,महाराष्ट्रात सुभाष देशमुखांच्या लोकमंगल बँकेला कोट्यावधी रुपये जुन्या नोटात सापडून दिलेली क्लिन चीट ,खाजगी बँकात अधिकारी वर्गानी राजरोसपणे जुन्या नोटा कमिशनवर बदलून दिल्याच्या बातम्या आणि गुन्हे दाखल झाल्यावरही अजूनही त्या खाजगी बँका सुशेगात सगळे व्यवहार करत असल्याच उदाहरण हे सगळ नोटाबंदीचा निर्णय मोजक्या लोकांना माहित असल्याच बोंबा मारून सांगतय.

ज्यांना माहित नव्हत अश्या बड्या धेंडानी मग मागच्या दाराने पैसे बदलायचा प्रयत्न केला आणि बहुतांशी राजकीय नेत्यांनी सरळ आपल्या निष्ठा बदलून भाजपात प्रवेश केला.

पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर असताना सगळे विरोधीपक्ष कंगाल झाले आणि उमेदवारांना आपापले खर्च करता करता नाकीनऊ आले.
ह्या कोंडीने भाजपात आयारामांची आवक प्रचंड वाढली आणि डोकी मोजण्याच्या खेळात उपयोगी पडली.

डिसेम्बर महिन्यात १५ लाख कोटी रुपये परत आले म्हणून रिझर्व्ह बँकेने सांगितल.उरलेले तीन लाख कोटी जमा करायला असलेले नियम अतिशय कडक असताना , प्रत्येक बँकेत कागदपत्र असल्याशिवाय एक रुपयाही स्विकारला जात नसताना तीन लाख कोटी रुपये मोजायला रिझर्व्ह बँकेला आठ महिने लागले नाहीत तर ते “ लावले गेले “

जर आधीच सगळे पैसे आलेत म्हणून रिझर्व्ह बँकेने घोषित केल असत तर निवडणुकात तोंडावर आपटायला झाल असत म्हणून उर्जित पटेलांच तोंड बंद ठेवून वेळकाढूपणा करायला लावला.

ह्या नोटा मोजायला नवी मशीन्स घ्यावी लागली अस रिझर्व्ह बँकेने खोट सांगितल जे माहिती अधिकारात उघड झालेलं आहे.

मुद्दलात नोटाबंदीची उद्दिष्ट आर्थिक नव्हतीच.

उद्दिष्ट फक्त राजकीय होती.

देश खड्ड्यात गेला तरी चालेल मात्र निवडणुका जिंकायच्या आणि नेत्यांना धाक दाखवून आपल्या कळपात यायला भाग पाडायचं हेच उद्दिष्ट असताना ते पूर्ण झालेलं आहे.

सामान्य माणसांना देशासाठी त्याग करायला लावण्याच भावनिक आवाहन करून ज्यांना नियमितपणे पगार दिला जातो अश्या बिनडोक ट्रोलच्या फौजा समर्थनार्थ उतरवून सगळ्या सामान्य माणसाला रांगेत उभ राहायला लावून गेले नऊ महिने मरणकळा सोसायला लागल्यात त्याची अजिबात फिकीर असण्याच कारण नाही.

कुठल्याही नियमाला ,आधार लिंक करायला , कर्जमाफीचे अर्ज भरायला ,पिकविम्याचे अर्ज भरायला ,नोटा भरायला नाहीतर बदलायला सगळी जनता सतत तणावाखाली राहावी , लाचार रहावी आणि तिने सरकार काय करतय , कुठल्या उद्योगांना माफी देतय ,कुठल्या बँकांची बुडालेली कर्ज राईट ऑफ करतय हे बघूच नये आणि बघितल तरी विचारू नये हे उद्दिष्ट सफल झालेलं आहे.

मुद्दलात ज्या निर्णयाची कुठलीही आर्थिक उद्दिष्ट नाहीत , ज्या निर्णयामागे पूर्णपणे निखालस अशी फक्त राजकीय उद्दिष्ट आहेत ती पूर्ण झाली तर निर्णय यशस्वी झाला असा दावा अतिशय योग्य आहे.

म्हणूनच सरकार आणि भक्तांशी मी सहमत आहे. आर्थिकदृष्ट्या नोटाबंदी पूर्णपणे फसलेली असली तरीही राजकीयदृष्ट्या पूर्णपणे यशस्वी झालेली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*