राणेंचे खोचक ट्विट; शिवसेना झाली आक्रमक..!

मुंबई :

माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील भांडण काही मिटण्याची चिन्हे नाहीत. एकमेकांवर टीका कारण्याची संधी हे दोन्ही गट नेहमी साधत असतात. आताही माजी खासदार निलेश राणे यांच्या खोचक ट्विटमुळे हे दोन्ही गट पुन्हा एकदा भिडले आहेत.

संजय राऊत इतके गरीब आहे की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेले. बाकी राहुद्या, त्यांना अगोदर कोणी तरी टीव्ही आणि लाईट बिलचे पैसे द्या आणि उध्दव ठाकरे यांना कॅडबरी चॉकलेट द्या. बिचाऱ्यांना वाईट वाटले की त्यांना खोटारडा म्हटले. शाळेत असल्यासारखे वाटले त्यांना बघून, असे त्यांनी ट्‌वीट केले आहे. त्यावर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत राणे यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*