अमृतराज कदम यांना कृषिथाॅनचा प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार जाहिर

पूर्णा : येथील प्रयोगशिल शेतकरी अमृतराज भुजंगराव कदम यांना कृषिथाॅनचा प्रयोगशील युवा शेतकरी २०१९ पुरस्कार जाहीर झाला असून त्यांना नाशिक येथे आयोजित कृषिथाॅन आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. नाशिक येथे ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन मीडिया एक्झिबीटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषिथाॅन या आंतरराष्ट्रीय पातळीवरील भव्य कृषि प्रर्दशन कार्यक्रमात ता.२३ नोव्हेंबर २०१९ रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात युवा शेतकरी प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत नव-नविन आव्हाने पेलत अधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करुन कृषी क्षेत्राला अधिक समृद्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत एक आदर्श निर्माण करतात. अशा युवकांचा व महिलांचा ‘कृषी संशोधन’,’कृषी उद्योग’ या क्षेत्रात केलेल्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा आणि त्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची योग्य दख्खल घेतली जावी. या उद्देशाने ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन नाशिक यांच्या वतीने ‘कृषिथाॅन युवा सन्मान पुरस्कार २०१९’ आयोजन करण्यात येते. या बहुमानाच्या पुरस्कारासाठी पूर्णा येथील शेती सेवा ग्रुप चे सदस्य व प्रयोगशील युवा शेतकरी अमृतराज कदम यांची निवड झाली झाली आहे.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ठक्कर्स डोम, नाशिक येथील आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात आयोजित भव्य कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते त्यांना हा बहूमानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ता.२१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान पाच दिवस चालणाऱ्या चौदाव्या कृषी प्रदर्शनास राज्य व भारतातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहाणार आहेत. अमृतराज कदम यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याची दखल घेत ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन नाशिक च्या वतीने त्यांची निवड झाल्या बद्दल पूर्णा तालुका शेती सेवा ग्रुप च्या वतीने अँड.गंगाधरराव पवार,रमेशराव दुधाटे, बालासाहेब हिंगे, मधुकर जोगदंड, प्रताप काळे, गोविंद दुधाटे, माधव आवरगंड, संभाजीराव भोसले, डॉ.सुधाकर महाजन, डॉ.विनय वाघमारे, विद्याताई पवार, सुभाष सूर्यवंशी, सुदामराव दुधाटे ,रमेश पवार,गोपाळ भुसारे,संतोष अवरगंड,प्रताप काळे,गोविंदराव आवरगंड,कृषी पत्रकार आनंद ढोणे यासह त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*