झरीत फळबाग उत्पादक शेतकरी मेळावा संपन्न

परभणी : तालूक्यातीलझरी येथे प्रयोशिल शेतकरी अॅग्रोवर्ल्ड कृषी गौरव पुरस्कार विजेत्या मेघाताई देशमुख यांच्या पेरु बागेच्या शेतावर ग्लोबल विकास मंचाचे अध्यक्ष तथा भ्रष्टाचार निर्मुलन चळवळीचे प्रणेते जलनायक मयांक गांधी, सिने अभिनेते सुमीत राघवन, तहसीलदार विद्याचरण कडावकर,जि कृषी अधीक्षक आळसे कृषीभूषण कांतराव झरीकर यांच्या उपस्थितीत ता ६ नोव्हेंबर रोजी दुपारी पार पडला. पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवड करुन वृक्ष जगवणे आवश्यक आहे. इतर वृक्ष लागवड न करता फळांची वृक्ष लागवड केली तर शेतकऱ्यांचे उत्पादनही वाढेल. असे मत मयंक गांधी यांनी व्यक्त केले.त्यासाठी ग्लोबल विकास मुंबई तर्फे एक कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्व फळांचे रोप अर्ध्या किंमतीत पुरविण्यात येतील. तसेच एकरी दहा हजाराचे लागवडीसाठी अनुदानही ग्लोबल तर्फे देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. सिनेअभिनेते सुमीत राघवन यांनी आजच्या घडीला पर्यावरणाची किती आवश्यकता आहे याचे मुंबई, दिल्लीत किती प्रदूषण वाढले या बद्दल माहिती देऊन शेतकऱ्यांनी वृक्ष लागवड जास्तीत जास्त करावी. असे आवाहन केले. फळबाग लागवड बाबत तहसीलदार कडावकर यांनी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक मेघाताई देशमुख यांनी केले तर सुत्रसंचालन सुभाष ढगे यांनी केले.मेळाव्याला असंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती लावली होती.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*