आमदार नाईक यांच्या दणक्यामुळे सर्व्हिस रोडवर कार्पेट..!

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे झालेले निकृष्ट काम, सर्व्हिस रोडची झालेली दुरावस्था, त्याचप्रमाणे महामार्गावर धुळीच्या साम्राज्यामुळे  वाहनचालक , प्रवाशी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत ठेकेदार व महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना सोमवारी जाब विचारला होता. यावेळी अधिकाऱयांना  आठ दिवसांत महामार्गावरील समस्या सोवडविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. आमदार वैभव नाईक यांच्या दणक्यामुळे हायवे ठेकेदाराने कुडाळ तालुक्यात पावशी  बेलनदी ते भांगसाळ नदी दरम्यान सर्व्हिस रोडवर कार्पेट केले आहे. तसेच  महामार्गावर पडलेले खड्डे बुझविले जात आहेत .
  
कुडाळ तालुक्यात महामार्गाची दुरावस्था झाल्याने वाहन चालक व नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. पदाधिकारी नागरिकांनी या दुरावस्थेबाबत अधिकाऱ्यांना अनेकवेळा सूचना दिल्या. मात्र अनेक समस्या जैसे थे होत्या. काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम झाल्याने पावसाळयात कुडाळ व पावशी येथे ठिकठिकाणी पुराची समस्या निर्माण झाली. लोकांच्या भातशेतीत पाणी व माती घुसली होती.अनेकांच्या घरांमध्ये  पाणी घुसले. पर्यायी मार्गावर मोठ्या प्रमाणात खडडे पडले होते. महामार्गावरील धुळीच्या त्रासाने प्रवाशी नागरिक त्रस्त  आहेत. मात्र ठेकेदार व हायवेचे  अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेत या समस्यां प्रश्नी ठेकेदार व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.  महामार्गवरील सर्व समस्या तात्काळ सोडविण्याच्या सक्त सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या होत्या. आमदार वैभव नाईक यांच्या दणक्यामुळे अधिकऱ्यांनी त्वरित  महामार्गावरील समस्या मार्गी लावण्यास सुरवात केली आहे. कुडाळ तालुक्यात सर्व्हिस रोडवर कार्पेट करण्याचे काम सुरु आहे. महामार्गवरील खड्डे बुझविण्यात येत आहेत. यामुळे धुळीचा त्रास कमी झाला आहे. याबद्दल सोशल मीडियावर आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले जात आहेत.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*