Blog | दांभिकांची मांदियाळी

बऱ्याच कलासक्त महिला आणि कलासक्त महिलांच्या पंखे असलेल्या पुरुषांना अचानक फेसबुक राजकारणाचा अड्डा झालंय, वातावरण फार गढूळ झालेलं आहे असला साक्षात्कार झालाय. बबडे आणि बबडीच्या बबड्या, याला कोल्ह्याला द्राक्षे आंबट अस म्हणतात. गेली पाच वर्षे अखंड मोदींनामाच्या आणि फडणवीस चालीसाच्या पोस्टीं टाकू टाकू तुम्ही जे पेरलं तेच उगवून वर आलेले आहे. आता बाजी पालटली तर लगेच वातावरण गढूळ झालं ? लगेच चित्रकला, कविता, कथा,पुस्तकांची परीक्षण , पाककला यामध्ये खरी संस्कृती आणि खरी रसिकता सापडायला लागली काय ? बबडे आणि बबडीच्या बबड्या, अजून तर खेळ सुरू व्हायचंच , आताशी गण गौळण झालीय , वग सुरू झाल्यावर काय करशीला रे ? लेखक : आनंद शितोळे, अहमदनगर
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*