पाणी योजनांना सौरवर करण्यासाठी जागा द्यावी : विखे

अहमदनगर : ज्या ठिकाणी पाण्याची उणीव आहेत ते अधिक बळकट करून सौर ऊर्जा प्रकल्प या योजनेसाठी आगामी काळामध्ये सौर ऊर्जेच्या माध्यमातून सर्व गावांना मोफत पाणी कशा पद्धतीने मिळेल याकरिता संबंधित ग्रामपंचायतीने तात्काळ जागा उपलब्ध करून द्याव्यात असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले आहे. दरम्यान जिल्हा परिषद शाळेच्या ज्या मोक्याच्या जागा आहेत त्या विकसित करून त्यांचा दर्जा सुधारता येईल का यासंदर्भात प्रशासनाने प्रयत्न करावेत असे सुचनाही खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्या. जिल्हा परिषद मध्ये आज अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, सुजित झावरे सदस्य, अनिल कराळे, बाळासाहेब हराळ, अर्जुन शिरसाठ, विश्वनाथ कोरडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, आदींसह शिक्षण, कृषी, बांधकाम विभागातील प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. खासदार विखे म्हणाले की, ज्या ठिकाणी भूसंपादन रस्त्यांची कामे सुरू आहे त्या लाभार्थ्यांच्या बरोबर बैठक घेऊन हा विषय मार्गी लावेल, त्याचप्रमाणे शाळांसाठी जिल्ह्यामध्ये 100 कोटींची आवश्यकता आहे एक वर्षात हा निधी उपलब्ध होऊ शकतो त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*