Blog | सेव्ह जेएनयू

हे जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या संबंधातील राजकीय नेते असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करा. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ ( जेएनयु ) मध्ये विद्यार्थी आंदोलन सुरु आहे.
वरवर पाहता आंदोलन फी वाढी च्या विरोधात आहे.समोर येणाऱ्या बातम्या तशाच आहेत. या विद्यापीठात शिकणारे बहुतांशी म्हणजे ४० टक्के विद्यार्थी दारिद्यरेषेखाली असलेल्या कुटुंबातून आहेत.दिल्लीमध्ये राहायला बाहेर भाड्याने जागा घेणे मध्यमवर्गीय माणसाला शक्य नाही तिथे गरीबांचा प्रश्नच नाही. पूर्वी असलेली मेसची फी ५५०० वरून १२००० केलीय शिवाय १७०० रुपये सेवाकर लावलेला आहे.
होस्टेलमध्ये सिंगल रूमचे भाडे २० रुपये महिन्यावरून ६०० रुपये केले आहे तर डबल रूमचे भाडे १० रुपयावरून ३०० रुपये केलेलं आहे. ताज्या बातमीनुसार प्रशासनाने काही प्रमाणात फी वाढ मागे घेतलेली आहे मात्र त्यावर विद्यार्थी समाधानी नाहीयेत. मुळात हा वाद किंवा संघर्ष एवढ्यापुरताच मर्यादित आहे का ? हे विद्यापीठ संघाचे सरकार केंद्रात आल्यापासून सातत्याने जाणीवपूर्वक बदनाम केल जातय.
हि बदनामी फक्त नेहरूंच नाव आहे म्हणून केली जातेय का ?
त्याच उत्तर नकारार्थी आहे. एक गैरसमज लोकांच्या मनात पसरवून दिलेला आहे कि हे विद्यापीठ म्हणजे डाव्या विचारांचा अड्डा आहे , इथे नक्षलवादी तयार होतात, फुटीरवादी तयार होतात आणि इथली पोर देशद्रोही आहेत.
मुळात डाव्या विचारांचे असणे गुन्हा नाहीये.प्रत्येक डावा माणूस नक्षलवादी आहे अस समजणे भाबडेपणा आहे. अगदी अचूक बोलायचं म्हटल तर इथले विद्यार्थी , इथल वातावरण ‘ स्वतंत्र ‘ विचारांचं आहे.
लिबरल विचारसरणी इथली लोक व्यवस्थेला प्रश्न विचारतात , रादर कुठलीही समोर आलेली गोष्ट प्रश्न विचारून, तपासून, तावून सुलाखून मगच स्विकारतात.
हेच सध्याच्या एकचालकानुवर्ती हुकुमशाही राजवटीला पसंत नाहीये ज्यांना फक्त अनुयायी लागतात तेही कवटीत निर्वात पोकळी असलेले.
इथून बाहेर पडणारा विद्यार्थी सतत प्रश्न विचारतो, स्वतंत्र विचार मांडतो आणि हेच सगळ्या समाजात पसरवतो.
संघाच आणि स्वतंत्र विचारांचं नात माहिती आहेच. त्यांना अशी केंद्र काहीही करून उखडून त्यांना धार्मिक राजकारणाचे अड्डे आणि भंपक राष्ट्रवादाच्या आरोळ्या देणारे माठ भवताली उभे करायचे आहेत.
म्हणून इथे सतत दडपशाही करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथल्या स्वतंत्र विचाराच्या बुद्धिमान प्राध्यापकांना प्रचंड छळाला सामोर जायला लागतय.
सततचे मेमो , चार्जशीट, मुलांना चिथावणी देण्याचे आरोप करून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभ केल जातय. एक उदाहरण सांगतो. १३ नोव्हेंबर २०१९ रोजी एक्झिक्युटिव्ह कौन्सिल ची मिटिंग कुलगुरू ठेवतात.तीन निवडून आलेले सदस्य आणि इतर काही डीन ठरलेल्या ठिकाणी मिटिंगच्या वेळेला सकाळी दहा वाजता पोहोचतात.मात्र सकाळी दहा पासून १०.४० पर्यंत कुणीही अधिकारी मिटिंग साठी येत नाहीत.एक सुरक्षा रक्षक येतो आणि काही ठराविक लोकांना बाजूला अज्ञातस्थळी घेऊन जातो. या तीन प्राध्यापकांना १२.४० वाजता प्रशासनाचा इमेल येतो , मिटिंग १२.३० मिनिटांनी ठरलेल्या ठिकाणापासून १८ किलोमीटर लांब दुसऱ्याच ठिकाणी ठेवलेली आहे.इतक्या कमी वेळात मिटींगला दिल्लीच्या वाहतुकीतून जाणे अशक्य आहे.अशातऱ्हेने या सदस्यांना मिटिंग मध्ये भाग घेण्यापासून बाजूला ठेवल जात. अशी अनंत उदाहरण आहेत जिथे जेएनयु चा आत्मा असलेला स्वतंत्र विचार दडपायला कारस्थान सातत्याने सुरु आहेत. हे विद्यापीठ एक वारसा आहे , विचारांचा, मोकळ्या वातावरणाचा आणि स्वतंत्र विचारांचा.म्हणून हे टिकायला हवय. ज्यांच्या नावाने विद्यापीठ आहे त्यांची कथा प्रसिद्ध आहे. नेहरूंच्या कॉलरला हात घालून एका भारतीय महिलेने प्रश्न विचारला , “ स्वातंत्र्य मिळाल त्याचा मला काय उपयोग झाला “ नेहरूंनी उत्तर दिल, “ देशाच्या प्रधानमंत्र्याची कॉलर पकडून हा प्रश्न विचारण्याच स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे “ प्रश्न सत्तेला विचारायचे असतात. जेएनयु चा वारसा इंदिरा गांधी सत्तेत असताना त्यांना विद्यापीठाच्या कुलपती पदाचा राजीनामा मागण्याचा आहे, त्यावेळी विद्यार्थी नेते होते सीताराम येचुरी. हा वारसा जपायला हवाय म्हणून हे सगळ लिहिण्याचा उद्योग. लेखक : आनंद शितोळे, अहमदनगर
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*