पवार बांधावर जाऊन जाणून घेत आहेत शेतकऱ्यांची व्यथा..!

नागपूर : सध्या महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असतानाच मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार यावर चर्चा सुरू आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी कृषिमंत्री शरद पवार थेट नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत. त्यांनी याबाबत ट्विट करून म्हटले आहे की, आज नागपूर मधील काटोल विधानसभा क्षेत्रातील ओल्या दुष्काळाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान चारगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली. यावेळी सरकारकडून काहीच मदत मिळाली नाही, कोणी पाहणी करायला आले नाही, पिकाला भाव नाही, अशा व्यथा हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी मांडल्या. https://t.co/svWXwGWudo
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*