खुशखबर | पुण्याहून नाशिक, कोल्हापूर व औरंगाबादला जा ‘ईबस’ने..!

पुणे :

शिवशाही बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर एसटी महामंडळ आता नवीन ई-बस अर्थात शिवाई लाँच करीत आहे. पहिल्या टप्प्यात पुणे-नाशिक, पुणे-काेल्हापूर आणि पुणे-औरंगाबाद या मार्गांवर शिवाई बस मार्च २०२० पर्यंत धावणार आहेत.

एसटी महामंडळाला महाराष्ट्र राज्य वीजपुरवठा महामंडळाकडून (महावितरण) उच्च दाबाची विद्युतवाहिनी आगारापर्यंत जाेडणी करून मिळाल्यानंतर तेथे खासगी बसमालक स्वखर्चाने चार्जिंग स्टेशन उभे करणार आहेत. प्रसन्ना पर्पल या खासगी वाहतूक संस्थेबराेबरच ५० ई-बस पुरविण्याचा करार महामंडळाने केला आहे. सरासरी ४५ रुपये प्रतिकिमी दराने महामंडळ संबंधित संस्थेकडून भाड्याने बस घेणार आहे. चार्जिंग स्टेशन उभारल्यावर या बसेस मार्च २०२० पर्यंत धावण्याची शक्यता आहे. या बससेवेचे तिकीट दर अजून निश्चित नाहीत. या नव्या बसेसमुळे प्रदूषण टळणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*