BLOG | समजून घ्यायला पाहिजेत डावखुऱ्याच्याही व्यथा..!

संदिप डांगेंचा डाव्या-ऊजव्या मेंदूची परीणामकारकता कशी आहे अशा आशयाची एक अभ्यापुर्ण पोस्ट वाचायला मिळाली. तरीही माझ्या निरीक्षणात आलेल्या काही गोष्टी यानिमित्ताने मांडत आहे.

1. डावखुऱ्या लोकांच वाढतां प्रमाण:
सामजिक दडपणातून नैसर्गिक डावखुऱ्या लोकांना ऊजव्या हाताचा वापर करायला लावल्यामुळे सुमारे २०० वर्षांपूर्वी डावखुऱ्या लोकांचे प्रमाण २% ईतकेच होते. जे आता वाढत जाऊन १०-१२% ईतके झालेले आहे.

2. पोस्टमधे म्हटल्याप्रमाणे दोन्ही मेंदू जरी समान कार्य करत असतील तरीही जेवणे लिहीणे, बाॅलिंग-बॅटींग यासाठी मेंदूच्या डाव्या भागाचं वर्चस्व याला कारणीभूत आहेच. जाणकारांना कृपया प्रकाश टाकावा.

3. काही लोक दोन्ही हातांचा वापर करणारे आहेत. मी ऊजवा हात वापरतो परंतू बाॅलिंग डाव्या हाताने तसंच अवजड कामं डाव्या हाताने करतो. डावखुऱ्या लोकांच्या ईतिहासापासून काही गोष्टीत डावखूरेणा रितसर डावलला गेलाय काही पिढ्यांनंतर हे प्रमाण ठळकपणे वाढेल.

4. यांत्रिक डिजाईन्समधे ergonomics चा अभ्यास केला जातो तेव्हा हा मुद्दा डावलला जातो असं माझंतरी निराक्षण आहे. याबाबतीत OSHA किंवा तत्सम मानंकनांमधे दखल घेतलेली नाहीये. एक साधं ऊदाहरण म्हणजे एखाद्या सर्वसामान्य जुळवणीत नट ऊजव्या बाजूच्या असतो परंतू डावऱ्या ॲापरेटरला ते नेमकं गैरसोईचं आहे. पण तोही सवयीप्रमाणे हे अंगवळणी पाडून घेतो.

5. हे फक्त इंजिनीअरींग डिजाईन्समधेच नाही पण बऱ्याच बाबतीत घडतं. जसं की पेनचं स्टॅन्ड, काटे-चमचे ठेवण्याच्य जागी, पंक्तीला पाण्याचं ग्लास आणि त्यामुळे होणारे छोटेफार अपघातही आपल्याला आढळतात.

6. पण काही ठिकाणी याचा विचार होणं निश्चित गरजेचं आहे. जसं की विमानातील emergency exit किंवा काही धोकादायक प्रक्रीया. emergency exit ऊजवाकडून डावीकडे फिरवावं लागतं पण जर तिथे एक डावखुरा प्रवासी असेल तर तो त्याच्या प्रवृत्तीनुसार प्रतिक्षीप्त क्रियेत डाव्या हाताचा वापर करणं स्वाभाविक आहे.

लेखक : जयेश निमसे, मुंबई (फेसबुक पोस्टवरून साभार)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*