राउत यांच्या ट्विटवर मलिक व सावंत यांचे सूचक ट्विट..!

मुंबई :

राज्यात भाजपला सत्तेबाहेर ठेऊन देशभरात नवा संदेश देण्याची तयारी शिवसेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने केली आहे. त्यानिमित्ताने सुरू असलेल्या टेलिफोनिक बैठकींवर सूचक ट्विट केल्याची जोरात चर्चा होत आहे.

आज सकाळी सेनेच खासदार संजय रूट यांनी आपल्या स्टाईलमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या काव्यपंक्ती ट्विट केल्या. त्यांनी म्हटले की, “आहुति बाकी, यज्ञ अधूरा, अपनों के विघ्नों ने घेरा, अंतिम जय का वज्र बनाने, नव दधीचि हड्डियां गलाएं।आओ फिर से दिया जलाएं।” तसेच त्यांनी इतरही काही ट्विटर पोस्ट करून लक्ष्य वेधले आहे.

त्यावर उत्तर म्हाणून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राहत इंदौरी यांची शायरी पोस्ट करीत म्हटले आहे की, जो आज साहिबे मसनद हैं कल नहीं होंगे किराएदार हैं ज़ाती मकान थोड़ी है”.

तर, मलिक यांच्या उत्तरावर अधिकाची टिपण्णी जोडताना कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, “गुरूर है, सत्ता का इस कदर उन्हें तो तख्तों को पलटने का हुनर हम भी रखते हैं!”

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*