सेनेसोबत काँग्रेसने जाऊ नये; निरुपम यांचे ‘ट्विस्ट’..!

मुंबई :

दिल्लीत शिवसेना खासदार संजय राउत यांनी महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांच्या मदतीने महिनाभरात सरकार स्थापन करण्याचा विश्वास व्यक्त केला. त्याचवेळी मुंबईतील कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी काँग्रेसने सेनेसोबत न जाण्याची भूमिका मांडणारे ट्विट केले आहे.

राज्याच्या राजकारणातील ट्विस्ट कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. राज्याच्या हितासाठी सेनेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा दावा करणार असल्याचे राउत यांनी दिल्लीच्या पत्रकार परिषदेत म्हटले. त्यावर लगोलग ट्विटर पोस्ट करण्याची तसदी घेऊन निरुपम यांनी हे पक्षाच्या भविष्यकालीन हिताचे धोरण ठरणार नसल्याचे म्हटले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*