Blog | पाळला शब्द, टिकवला विश्वास..!

ही पोस्ट साधारपणे महिनाभर अगोदरच बनवून ठेवली होती आमचे मार्गदर्शक मित्र नितीन उदमले सरांनी.. Nitin Udmale

राज्यात राजकीय घडामोडी घडत होत्या. उलटसुलट त्रैराशिक मांडून माध्यमे गणित जुळवत होते. पवार साहेब आणि उद्धव ठाकरे आपापल्या पध्दतीने गणित मांडून सत्तेतील आपापला वाटा मान्य करून घेत होते. त्यावेळी आमचे उदमले सर देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार असेच ठासून सांगत या इमेजेस दाखवून विश्वास व्यक्त करीत होते..

मी मनोमन हसून त्यांना दाद दिल्यागत करीत होतो. पण भाजप पुन्हा कशीही सत्तेत येणारच नाही असा मनोमन अडाखा मांडून त्यांना प्रतिक्रिया देत होतो. ते फक्त हसून ‘पाहत राहा’ इतकेच बोलून आमची खेचत होते..

अखेर आज त्यांचेच म्हणणे नाही तर विश्वास खरा ठरला. फडणवीस पुन्हा सत्तेवर आले. तेही अनपेक्षितपणे. अजितदादा यांच्या साथीने..!

आज माझी राजकीय नशा आणि अभ्यासाची झिंग एकाच झटक्यात उतरली आणि अजूनही आपल्याला खूप काही शिकायला पाहिजे याची खरी जाणीव झाली…

फडणवीस साहेब, अजितदादा व उदमले सरांचेही अभिनंदन. चला, कामाला लागुया. समजत नसलेल्या राजकीय डावात उगीच नाक खुपसून बसण्यापेक्षा कामात झोकून देऊया…

आपल्या विचारांच्या नेत्यावर विश्वास असावा उदमले सरांसारखा आणि आपल्या ‘विचारी’ म्हणवून घेणाऱ्या नेत्यावर अजिबातच विश्वास ठेवू नये तो माझ्यासारखा..

लेखक : सचिन मोहन चोभे

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*