चंद्रकांत पाटलांनी केले अजितदादांचे अभिनंदन..!

पुणे :

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यातील राजकीय वैमनस्य जगजाहीर आहे. मात्र, आता अजितदादा भाजपच्या गोटात दखल झाल्याने यावर पडदा पडला आहे. पाटील यांनी चक्क अजित पवार यांचे अभिनंदन करून कटुता संपल्याचा संदेश दिला आहे.

ट्विटरवर पोस्ट करून पाटील यांनी म्हटले आहे की, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी मा. @Dev_Fadnavis व उपमुख्यमंत्रीपदी मा. @AjitPawarSpeaks विराजमान झाल्याबद्दल दोघांचे हार्दिक अभिनंदन.महाराष्ट्राला विकासाच्या प्रक्रियेत अग्रेसर ठेवण्यासाठी व राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी उभय नेतृत्व कार्यशील राहिल, जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करतील.

पाटील यांच्या या पोस्टवर अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया देऊन प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर पाटील काय प्रतिक्रिया देतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*