कॉंग्रेस अभेद्य; सेना-राष्ट्रवादीबरोबरच असल्याचा पुनरुच्चार..!

मुंबई :

पहाटेपासून सुरू झालेल्या राजकीय कुरघोडीच्या खेळत कॉंग्रेस कुठे आहे असा प्रश्न भाजपचे शिलेदार उपस्थित करीत आहेत. त्याला प्रत्युत्तर देतानाच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मदतीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याचा विश्वास कॉंग्रेस पक्षाने व्यक्त केला आहे.

अधिकृत ट्विटर खात्यावर आपली भूमिका कॉंग्रेस पक्षाने जाहीर केली आहे. त्यात म्हटले आहे की, राज्यात स्थिर सरकार देण्याबाबत शुक्रवारी आमची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली होती. आजही बैठक होणार होती पण त्यापूर्वीच या घटना घडल्या आहेत. आम्ही तिन्ही पक्ष सोबत आहोत. काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार पक्षासोबत आहेत. आमचा एकही आमदार फुटणार नाही. आम्ही राजकीय आणि न्यायालयीन लढाई लढू. ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना फोन केला त्याच्या दुस-या दिवशी सकाळी आम्ही मुंबईत पोहोचलो होतो आणि सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरु केली होती. काँग्रेस पक्षाकडून कोणताही उशीर झाला नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*