शिवभक्तांची माफी मागा : संभाजी महाराज

दिल्ली :

शिवसेना या पक्षावर टीका करताना केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याने महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. त्यावर शिवभक्तांची माफी मागण्याचे आवाहन खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी केले आहे.

त्याबाबत त्यांनी लेटरहेडवर पत्र दिले आहे. तसेच ट्विट करून त्याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आजकालच्या आचार आणि विचार शून्य राजकरण्यांनी महाराजांचं नाव राजकारणात वापरू नये अशीही सर्व शिवभक्तांची भावना आहे. त्यामुळे केंद्रीय विधी व न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी तात्काळ अन बिनशर्त माफी मागावी. केंद्रीय विधी व न्याय मंत्री श्री रवी शंकर प्रसाद आपण आधी तमाम शिवभक्तांची माफी मागा. आज महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थिती वर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण महाराजांच्या नावाचा उल्लेख एकेरी पद्धतीने केला आहे. शिवरायांचा एकेरी उल्लेख करायचा अधिकार या देशात कुणालाच नाही.”

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*