अजितदादांची गुगली; म्हणाले ‘मी राष्ट्रवादीत, पवार साहेब हेच नेते आणि..’

पुणे :

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत राहण्याचे स्पष्ट संकेत देतानाच पुन्हा एकदा राजकीय गुगली फेकली आहे. त्यांनी ‘मी राष्ट्रवादीत आणि पवार साहेब हेच नेते’ ट्विटर पोस्ट करीत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

त्यांनी इंग्रजीत ट्विट केले आहे की, “मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्येच आहे आणि आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब हेच आहेत. तसेच भाजप-राष्ट्रवादी या दोन्हींचे सरकार स्थापन होणार असून पुढील सलग पाच वर्षे या दोन्ही पक्षांचे स्थिर सरकार महाराष्ट्राच्या विकासाला गती देणार आहे.”

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*