भ्रष्टवादी असूनही पावन कसे झाले; महाराष्ट्र बुचकळ्यात..!

पुणे :

राष्ट्रवादी नव्हे भ्रष्टवादी पार्टी असे म्हणून भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला वेळोवेळी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. हेच नाही तर ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यातील प्रमुख आरोपी म्हणून अजित पवार यांना तुरुंगात पाठविण्याच्या धमक्या जाहीर व्यासपीठावरून वेळोवेळी भाजपच्या नेत्यांनी दिलेल्या असतानाही तेच अजितदादा एकाच अंधाऱ्या रात्रीत पावन कसे झाले, याचे कोडे अवघ्या महाराष्ट्राला पडले आहे.

सध्या राज्यात फ़क़्त दोनच विषयवार चर्चा सुरु आहे. पहिला विषय म्हणजे राष्ट्रवादीचे काय होणार आणि ३० तारखेला भाजप बहुमत सिद्ध करणार का..? मात्र, त्याच चर्चेत अजितदादा एकाच रात्रीत साव कसे झाले, यावर बोलले जात आहे. पवार कुटुंबीय हे भ्रष्ट आणि चोर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि इतरांनी राज्यात मराठी भाषेत हजारदा म्हटले आहे. तर, हिंदी भाषेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनीही भ्रष्टवादी असा उल्लेख अजितदादा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा केला आहे. मात्र, आता तोच पक्ष आणि त्यातील नेते पावन झाल्याने महाराष्ट्र बुचकळ्यात पडला आहे. त्याचीच चर्चा जोरात सुरु आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*