BLOG | अमित शहाला चाणक्य का म्हणत असावेत..?

इसके लिये थोडा हिस्ट्री में जाना पडेंगा…इसवी सन पूर्व पाचव्या शतकाच्या सुमारास नंद साम्राज्य जोरावर होते. नंद साम्राज्याचा उगम होण्यापूर्वी एकसंध मोठे असे कोणतेही साम्राज्य त्यापूर्वी अस्तित्वात आले नव्हते. नंद साम्राज्याचा उदय शिशुनागाचे राज्य बळकावून झाला होता. शिशुनाग घराण्याच्या आधी कुरुवंशीय (तेच महाभारतवाले) घराण्याचे राज्य मगध देशावर होते. तोवर छोट्या छोट्या राजांचे छोट्या छोट्या भूभागावर राज्य असायचे. त्यामध्ये वेदिक संस्कृती मूळ धरून होती. राज्यकर्ते क्षत्रिय किंवा ब्राह्मण असले तरी मुख्यत्वे: ब्राह्मणांचा राजकारण आणि समाजकारणावर मोठा प्रभाव होता.

लेखक : संदीप डांगे, नाशिक

पार पंजाबपासून ते ओडीसापर्यंत, गुजरात आणि विदर्भ मराठवाड्यापर्यंत पसरलेले हे साम्राज्य जैन, बौद्ध आणि हिंदू ह्या तिन्ही धर्माच्या लोकांसाठी कोणताही भेदभाव न करणारे अशा लौकीकाचे होते.कोणत्याही विशिष्ट धर्माला जास्त महत्त्व देऊन राजाश्रय देणारे नव्हते. नंद राजे सर्व लोकांना समान दर्जाने वागवणारे असल्याने ब्राह्मणांचा व एकूण वेदिक संस्कृतीचा प्रभाव फारच कमी होत चाललेला होता. विष्णुगुप्त म्हणजेच कौटिल्य म्हणजेच आपले चाणक्य ह्यांना नंद साम्राज्य न आवडण्याचे हे एक प्रमुख कारण. दुसरे कारण असे कि नंद साम्राज्याचा संस्थापक महापद्म नंद हा जन्माने उच्चकुलीन किंवा राजवंशीय नव्हता. त्याच्या जन्माबद्दल दोन मतप्रवाह आहेत. काही लोक म्हणतात कि तो शिशुनाग घराण्याच्या शेवटच्या राजाचा एका शूद्र स्त्रीपासून झालेला मुलगा होता तर काही म्हणतात कि राजघराण्याला सेवा पुरवणाऱ्या न्हाव्याचे राजाच्या पत्नीशी संबंध आल्याने जन्मलेला होता. एकूण काय तर तो हीनकुलीन होता. तरी त्याने शिशुनागचे घराणे समूळ संपवून स्वतः:ला राजा घोषित केले आणि आपले साम्राज्य वाढवले.

नंद साम्राज्याचा शेवटचा राजा धना नंद. ह्याने हुशार विष्णुगुप्ताचा भर सभेत अपमान केला तेव्हा विष्णुगुप्ताने आपले जानवे तोडले,शेंडी सोडली आणि जोवर नंद साम्राज्य नष्ट करणार नाही तोवर शेंडीचे केस बांधणार नाही अशी शपथ घेतल्याचे सांगितले जाते. इतिहासाच्या खरेखोटेपणात इथे जायची आपल्याला अजिबात आवश्यकता नाही कारण सामान्य लोकांत चाणक्याची प्रतिमा आणि कथा काय आहे त्यावरच आपल्याला विचार करायचा आहे.

हीनकुलीन नंद साम्राज्य हे देशासाठी, संस्कृतीसाठी आणि धर्मासाठी घातक आहे असे चाणक्याचे मत होते. धनानंद हा विचित्र वागणुकीसाठी जनतेत बदनाम सुद्धा झालेला होता. अशावेळी चाणक्याने चंद्रगुप्त नावाच्या धनगर पोराला हाताशी धरून नंदाचे साम्राज्य संपुष्टात आणले. मौर्य साम्राज्य प्रस्थापित झाले आणि चाणक्याच्या साम दाम दंड भेद ह्या नीतीचा वापर करत प्रचंड वाढले. पुढे सम्राट अशोकाने परत वैदिक धर्म गाळात घालत बौद्ध धर्माला राजाश्रय दिल्याने ब्राह्मणांमध्ये असंतोष वाढत गेला. यथावकाश पुष्यमित्र शुंग ने मौर्य साम्राज्य संपवले आणि क्रूरपणे भारतातून बौद्ध धर्म संपवला आणि ब्राह्मणी साम्राज्य स्थापन केले.

तर मूळ कहाणी इतकीच आहे कि आपल्या दृष्टीने ‘संस्कृतीस घातक, धर्मास घातक’ असे राज्य कोणत्याही मार्गाचा वापर करून संपुष्टात आणणे व आपली सत्ता प्रस्थापित करणे ही चाणक्याची ओळख आहे. कॉंग्रेस आणि इतर सर्व बिगर भाजपाई सरकारे ही नंदसाम्राज्याची प्रतीके आहेत, त्यांना भल्या बुर्या कोणत्याही मार्गाने संपवणे म्हणजे धर्मकार्य आहे, राष्ट्रकार्य आणि देशभक्ती आहे असे तमाम संघोट्याना वाटते. सातत्याने ‘राहुल गांधीचा खरा बाप कोण, सोनिया गांधी इंदिरा गांधी ह्यांच्या चारित्र्यावर चिखलफेक’ हे सर्व विषय का चघळले जातात ह्याची गंगोत्री इतिहासात मिळते. नैतिकता, शुचिर्भूतता, कायदेशीरपणा ह्या गोष्टी तिथे कधीच लागू होत नसतात. कारण आपल्या ध्येयाच्या आड येणारे असे अडथळे जुमानायचे नसतात. ह्या सर्व उदात्त बाबी केवळ प्रतिस्पर्ध्याला मानसिक दृष्ट्या भ्रमित व अपराधी जाणवून देण्यासाठी वापरायच्या असतात. सत्ता गेल्यावर आणि बिगर बाजपाई सत्ता येत असल्याकारणे अमित शहा आणि देवेंद्र ह्यांनी व्यक्त केलेले मत ह्या सगळ्याचा मोठा पुरावा आहेत. त्यासोबत नवीन सरकार भाजपचे नाही म्हणून लवकर पडले पाहिजेत, रा कॉ सेना आणि कॉंग्रेस ह्यांची आघाडी टिकलीच नाही पाहिजे ह्यासाठी मनापासून धावा करणारे भाजपचे समर्थक जनतेच्या भल्यासाठी नव्हे, स्थिर सरकार असू देत म्हणून नव्हे तर फक्त आपल्या ‘मनाचे’ सरकार नसणार म्हणून ठणाणा बोंबलत आहेत. म्हणजेच ह्यांना जनतेबद्दल प्रेम नाही, राज्य सरकार व्यवस्थित चालले पाहिजे असे वाटत नाही. ह्यांच्याशिवाय देशद्रोही कोणी असू शकते का?

‘चाणक्य’ म्हणजे ‘कसेही करून आपल्याला हवे तेच घडवून आणणे ‘इतकेच नाही तर त्यामागे ‘आपलीच (आपल्या जातीची/धर्माची/वैदिक संस्कृतीची) सर्वोच्च सत्ता असावी’ ह्यासाठीच आटापिटा आहे. संघाच्या स्थापनेपासूनच ह्या उद्दिष्टाकडे त्यांची वाटचाल राहीली आहे . ‘काय सारखे चाणक्य चाणक्य करतात’ म्हणून हसून सोडून देण्यासारखा आणि मिम्स बनवून वायरल करण्याइतका छोटा विषय नाही. लक्षात ठेवा, ह्यांची चाल ओळखून संघविरोधी लोकांनी एकत्र येणे व आपला आवाज बुलंद करणे जास्त गरजेचे आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*